Category: Government Documentation & Identity Services
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. आमच्या 'राज-रतन ई-सुविधा केंद्र' मध्ये नागरिकांना सुलभ आणि जलद सेवा मिळावी म्हणून सर्व प्रकारच्या आधार संबंधित ऑनलाइन सेवा पुरविल्या जातात. या सेवांमध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होतो:
आधार डॉक्युमेंट अपडेट (Aadhaar Document Update): तुमचे आधार कार्ड १० वर्षे जुने असल्यास ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा ऑनलाइन अपडेट करणे बंधनकारक आहे.
नवीन आधार कार्ड डाऊनलोड (Aadhaar Card Download): हरवलेले किंवा नवीन अपडेट झालेले आधार कार्ड ऑनलाइन शोधून डाऊनलोड करणे.
आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर (PVC Plastic Card Order): सुरक्षित आणि टिकाऊ प्लास्टिक एटीएम सारखे आधार कार्ड थेट घरपोच मागवणे.
मोबाईल नंबर लिंक स्टेटस तपासणे (Check Mobile Link Status): तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे की नाही, हे ऑनलाईन व्हेरिफाय करणे.
ई-आधार प्रिंटिंग सेवा (E-Aadhaar Color Print): डाऊनलोड केलेले आधार कार्ड चांगल्या कॉलिटीच्या पेपरवर प्रिंट करून देणे.
आधार सेवांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Required Documents):
ओळखीचा पुरावा (Proof of Identity) – जसे की पॅन कार्ड, सरकारी ओळखपत्र किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड.
पत्त्याचा पुरावा (Proof of Address) – जसे की लाईट बिल, रेशन कार्ड किंवा बँक पासबुक.